उच्च न्यायालयाजवळच महिला साक्षीदाराला धमकी

साक्ष देऊ नये म्हणून धमकी दिल्याचा आरोप

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
female witness threatened एका दाखल गुन्ह्यात आरोपीविरुद्ध साक्ष देण्यासाठी आलेल्या ३४ वर्षीय महिला साक्षीदाराला नागपूर खंडपीठाच्या उच्च न्यायालयाजवळ धमकावून शिवीगाळ केल्याची तसेच तिला त्रास दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राकेश सुखदेव मोदीपाल (३८, रा. बिनाकी मंगलवारी) असे आरोपीचे नाव आहे.

female witness threatened 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ ऑगस्ट रोजी दुपारी २.४५ ते सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास उच्च न्यायालयाजवळ घडली. तक्रारदार महिला तिचा मित्र गौरव शर्मा (४३, रा. बेलतरोडी) याने आरोपीविरुद्ध दाखल केलेल्या एका फौजदारी प्रकरणात साक्ष देण्यासाठी न्यायालयात आली होती. महिला न्यायालयाजवळ एका बाकावर बसलेली असताना आरोपी राकेश मोदीपाल तिच्याजवळ आला आणि तिच्या शेजारी बसला. त्यानंतर त्याने महिलेला लाथ मारुन त्रास दिल्याचा आरोप आहे. तसेच, संबंधित प्रकरणात साक्ष देऊ नये, अशी धमकी त्याने दिली.female witness threatened महिलेने साक्ष दिल्यास त्याचे परिणाम तिला भोगावे लागतील, तसेच साक्ष दिल्यानंतर ‘काय होते ते पाहून घेईन’, अशा शब्दांत आरोपीने धमकावल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर आरोपीने महिलेला अश्लील शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे. न्यायालयाच्या आवारातच हा प्रकार घडल्याने महिलेला मानसिक त्रास आणि अपमान सहन करावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर महिलेने सदर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी राकेश मोदीपालविरुद्ध संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदविला आहे.