नागपूर,
Govindrao Wanjari Ayurvedic College गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक महाविद्यालय व संशोधन केंद्रात २ सप्टेंबर रोजी औषध सुरक्षा निरीक्षण व रुग्ण सुरक्षा विषयक जनजागृती कार्यक्रम झाला. आयुष मंत्रालयाच्या आयुषुरक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पेरीफेरल औषध सुरक्षा निरीक्षण केंद्राच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डॉ. मनीष भोयर, डॉ. पूनम राऊत व प्राचार्य डॉ. वीरेंद्र के. शहा यांनी औषधांच्या प्रतिकूल प्रतिक्रियांची वेळेवर नोंद, औषधांचा सुरक्षित व तर्कसंगत वापर आणि रुग्ण सुरक्षेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मयूरी दानी होत्या. औषधांच्या प्रतिकूल प्रतिक्रियांची नोंद करून रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले.
सौजन्य: मयूर पडोळे,संपर्क मित्र