ओयो हॉटेलमध्ये सापडला जीम ट्रेनरचा मृतदेह

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
oyo hotel शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीत लाखो रुपयांच्या कर्जाचा डोंगर झाल्यामुळे एका जीम ट्रेनरने सुपर ओयो हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज बुधवारी पहाटेच्या सुमारास मनीषनगरात उघडकीस आली. प्रथमेश हेमंत शेंडे (२३, ओंकार अपार्टमेंट, जयप्रकाशनगर) असे मृत युवकाचे नाव आहे.
 
 
oyo hotel
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश हा मनीषनगरातील लेव्हल फिटनेस या जीममध्ये ट्रेनर म्हणून नोकरी करतो. तो शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक करीत होता. दुप्पट-तिप्पट पैसे मिळाल्यानंतर त्याने लाखो रुपये शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविले. मात्र, त्यामध्ये त्याचे पैसे बुडाले. त्यामुळे नैराश्यात गेला. त्याचे कामातही लक्ष लागत नव्हते. त्याने जीममधून पैसे घेऊन भरपाई करण्याचा प्रयत्न केला. तसेच मित्र आणि सावकारांकडून कर्ज घेतले. मात्र, दिलेल्या मुदतीपर्यंत पैसे परत न केल्यामुळे त्याच्यामागे पैशांसाठी तगादा लागला. त्यामुळे तो त्रस्त झाला. त्याने मंगळवारी मनीषनगरातील ओयो हॉटेलमध्ये रूम बूक केली. रात्री टीव्ही लावला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली.oyo hotel या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
अशी आली घटना उघडकीस
प्रथमेशची प्रेयसी इंजिनीअर असून ती नोकरी करते. तो प्रेयसीच्या रूमवरच राहत होता. प्रथमेश बेपत्ता झाल्याची माहिती मित्रांनी तिला फोन करून दिली. तिने प्रथमेशचा दुसरा मोबाईल क्रमांक दिला असता काही मित्र लोकेशनवरून ओयो हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांना रूममध्ये प्रथमेश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याने आतापर्यंत ३ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे समोर आले असून पुढील तपास सुरू आहे.