मालेगाव,
malegaon soybean मालेगाव तालुयात पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिकाला पाण्याची आवश्यकता भासत असतानाच आता विविध प्रकारच्या रंगीबेरंगी अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
सोयाबीन पीक शेंगा लागण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात असताना अळ्यांकडून पाने तसेच शेंगांचे नुकसान होत असल्याचे शेतकर्यांच्या निदर्शनास येत आहे.अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकर्यांकडून कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे. मात्र, फवारणीनंतरही अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिकाला पाण्याची गरज निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे अळ्यांचा वाढता प्रादुर्भाव पिकासाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे पावसाअभावी पिकांची चिंता आणि त्यात अळ्यांचा वाढता प्रादुर्भाव, अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकर्यांना करावा लागत आहे.
अळ्यांचा प्रादुर्भाव वेळीच नियंत्रणात न आल्यास सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शयता आहे. त्यामुळे कृषी विभागाने तालुयातील सोयाबीन शेतांची तातडीने पाहणी करून अळ्यांची शास्त्रीय पद्धतीने ओळख पटवावी, प्रादुर्भावाची तीव्रता निश्चित करावी आणि योग्य कीड नियंत्रण उपाययोजनांबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.