अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीवर दोषारोप करता येणार नाही

मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला २.१७ लाख रुपयांची अतिरिक्त भरपाई

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
motor accident claim ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनीने दाखल केलेले अपील मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावले आहे. न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाने मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवत, मृत व्यक्तीच्या वारसांना २,१७,००० रुपयांची अतिरिक्त भरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला दिलेत.
 
gcjfgjfgj
 
 
 
२० ऑगस्ट २०१५ रोजी सकाळी १० च्या सुमारास नागपूर-कोराडी महामार्गावरील विद्या नगर चौकात हा अपघात घडला होता. एम.एस.ई.टी.सी.एल. मध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले मोहम्मद फिरोज अली (५४) हे आपल्या मोपेडने जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव टाटा ४०७ मिनी ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कोराडी पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहम्मद फिरोज अली यांच्या वारसदारातर्फे ॲड. एस.ओ.अहमद यांनी बाजू मांडली.
विमा कंपनीचा युक्तिवाद नाकारला
विमा कंपनीने कोर्टात दावा केला होता की, मृत दुचाकीस्वाराने अचानक यु-टर्न घेतल्यामुळे हा अपघात घडला आणि त्यात मृत व्यक्तीचीही निष्काळजीपणाची सह-जबाबदारी होती. मात्र, कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळताना स्पष्ट केले की, शहर परिसरात वाहनाचा वेग नियंत्रित ठेवणे ही मिनी ट्रक चालकाची जबाबदारी होती. विमा कंपनीने न्यायाधिकरणासमोर कोणताही स्वतंत्र पुरावा किंवा ट्रक चालकाची साक्ष नोंदवली नाही. केवळ 'यु-टर्न' घेतला म्हणून दुचाकीस्वाराला अपघातासाठी दोषी धरता येणार नाही.
अतिरिक्त भरपाई का मंजूर झाली?
न्यायाधिकरणाने यापूर्वी पीडित कुटुंबाला ४८,९७,७६८ रुपयांची भरपाई मंजूर केली होती.motor accident claim हायकोर्टाने सर्वोच्च न्यायालयाच्या 'प्रणय सेठी' खटल्यातील मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेत, पारंपारिक रकमांमध्ये दर तीन वर्षांनी १० टक्के वाढ लागू करून २,१७,००० रुपयांची अतिरिक्त भरपाई मंजूर केली.
न्यायालयाचे आदेश
चोलामंडलम इन्शुरन्स कंपनीने ही अतिरिक्त २,१७,००० रुपयांची रक्कम ३ महिन्यांच्या आत हायकोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करावी. रक्कम जमा झाल्यानंतर मृत मोहम्मद फिरोज अली यांच्या पत्नी व मुलांना ती काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.