अनिवासी भारतीयांच्या १२७ अब्ज डॉलर्सच्या ठेवी

भारतीय रिझर्व्ह बँकेची माहिती

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
मुंबई, 
nri-deposits-forex-reserves-indiaअनिवासी भारतीयांकडून मिळालेल्या दमदार प्रतिसादामुळे बॅॅंकामध्ये १२७.२३ अब्ज डॉलर्सच्या ठेवी जमा आहेत. पर्यायाने परकीय चलन साठ्यात मोठी वाढ होण्यासाठी अनिवासी भारतीयांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे भारतीय रिझर्व्ह बॅंकेने निवेदनात म्हटले आहे.
 
rbi
 
एफसीएनआर ठेवी, परदेशी परकीय चलन कर्ज (ओएफसीबी) आणि बाह्य व्यावसायिक कर्जासाठी रिझर्व्ह बँकेची विशेष यूएसडी-आयएनआर फॉरेक्स स्वॅप सुविधा ८ जून रोजी सुरू करण्यात आली. जागतिक बाजारातील अनिश्चिततेच्या काळात भारताचे बाह्य क्षेत्रातील स्थान मजबूत करण्यासाठी आणि परकीय चलन तरलतेला पाठिंबा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही सुविधा जाहीर करण्यात आली होती. या उपाययोजनांमुळे देशात परकीय चलनाच्या ओघात मोठी वाढ झाली असून, ३१ ऑगस्टपर्यंत एकूण १३६.३७७ अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा बॅंकाममध्ये ठेवीच्या स्वररूपात जमा झाला. या योजनेला अनिवासी भारतीयांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
योजनेअंतर्गत, बँकांकडून परकीय चलन ठेवीवर आकर्षक व्याजदर दिले जाते. या योजनेला मिळालेला प्रतिसाद इतका जोरदार होता की, आरबीआयने आपले उद्दिष्ट वेळेच्या आधीच साध्य करून, एफसीएनआर(बी) विंडो बंद करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्टवरून ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. परदेशी परकीय चलन कर्जांनी एकूण आवकमध्ये ५.२६ अब्ज अमेरिकी डॉलर्सचे योगदान दिले, तर बाह्य व्यावसायिक कर्जांची रक्कम ३.८९१ अब्ज अमेरिकी डॉलर्स होती, ज्यामुळे एकूण आवक १३६.३७७ अब्ज अमेरिकी डॉलर्स झाली.