वर्धा,
transgender person arrested रेल्वेचा प्रवास म्हणजे किन्नरांचा त्रास आलाच. वर्धेहून पुढे जाताना पुलगाव रेल्वे स्थानकाहून किन्नर हमखास चढतात आणि ते बडनेरापर्यंत प्रवाशांना सळो की पळो करू टाकतात. दरम्यान, आज मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य प्रणव जोशी यांनी मेमू या रेल्वेने प्रवास करताना केलेल्या तक्रारीवरून एका किन्नरला पोलिसांनी अटक केली.
जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर ते अमरावती धावणार्या मेमू ही प्रवासी रेल्वे नेहमीच सुरक्षेशिवाय धावत असते. असाच काहीसा प्रकार वर्धा-भुसावळ या प्रवासी रेल्वेतही असतो. दरम्यान, आज समिती सदस्य जोशी यांनी वर्धा ते अमरावती या मेमू प्रवासी रेल्वेने प्रवास केला असता पुलगाव येथुन मोठ्या प्रमाणात किन्नरांचा जत्था गाडीत चढला. काही वेळातच त्यांनी प्रवाशांना १०-१० रुपयांची मागणी सुरू केली. प्रवाशांनी धाकापोटी ५ रुपये दिल्यास किन्नर ते पैसे देणार्यांच्या अंगावर फेकून त्यांना कानपटातही मारत होते.
या घटनाक्रमाची तक्रार जोशी यांनी रेल्वेच्या अधिकार्यांना करताच धामणगाव येथुन एका किन्नरला अटक केली. मेमू सारख्या इंटरकनेक्ट प्रवासी गाडीत रेल्वे पोलिस असणे अपेक्षित आहे. परंतु, मेमू या गाडीत पोलिसांचा बंदोबस्त राहत नसल्याने रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न कायम अजेंड्यावर असतो. रेल्वे विभाग प्रवाशांच्या मदतीसाठी कायम तत्पर असते. त्यासाठी ठिक ठिकाणी मोबाईल नंतर, इ मेल दिलेला असतो. परंतु, प्रवासी कायम दुर्लक्ष करीत असल्याने रेल्वे प्रवासातील किन्नर वा अन्य गुडागर्दीला आळा घालता येत नाही. प्रवाशांनीही होणार्या अन्याया विरोधात तक्रार केलीच पाहिजे, असे प्रणव जोशी यांनी सांगितले. रेल्वे विभागाच्या वतीने प्रत्येक रेल्वे स्थानकावर सीसी टिव्ही कॅमेरे लावले आहेत. त्या आधारावर रेल्वे पोलिसांही स्वत: पुढाकार घेऊन कारवाई केली पाहिजे, असे जोशी म्हणाले.