अबब...प्रिन्स चार्ल्सला भेटण्यास पाक खेळाडूंचा थेट नकार!

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
लंडन,
Pakistani players refuse to meet Prince Charles इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तान क्रिकेट संघाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सात खेळाडूंना संघातून वगळून मायदेशी पाठवले. त्यानंतर आता संघातील अंतर्गत नाराजीचे संकेत मिळाले असून, वगळण्यात आलेल्या खेळाडूंपैकी एका क्रिकेटपटूने राजा चार्ल्स तिसरे यांच्यासोबत झालेल्या भेटीला जाण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. ही भेट २ सप्टेंबर रोजी लंडनमधील क्लेरेन्स हाऊस येथे झाली.
 
 
Pakistani players
 
इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका पाकिस्तानसाठी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. पहिल्या दोन सामन्यांत मोठे पराभव पत्करल्यानंतर मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना ९ सप्टेंबर रोजी एडजबॅस्टन स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याआधी संघात मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. सात खेळाडूंना वगळण्याबरोबरच प्रशिक्षकवर्गातही बदल करण्यात आले असून, उर्वरित मालिकेसाठी माईक हेसन यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघातून वगळण्यात आलेल्या सात खेळाडूंसह सर्व खेळाडूंना राजा चार्ल्स यांच्या भेटीसाठी क्लेरेन्स हाऊसमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, बोर्डाच्या निर्णयाविरोधातील नाराजीमुळे एका खेळाडूने या कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, वगळण्यात आलेल्या सातपैकी मुहम्मद अवैस जफर, आमिर जमाल, खुर्रम शहजाद आणि अली उस्मान हे चार खेळाडू राजा चार्ल्स यांच्या भेटीसाठी उपस्थित होते.या भेटीदरम्यान राजा चार्ल्स यांनी पाकिस्तान संघातील खेळाडू आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने स्वाक्षरी केलेली क्रिकेट बॅट राजा चार्ल्स यांना भेट दिली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनीही त्यांना भेटवस्तू दिली. नक्वी यांच्या म्हणण्यानुसार, ही भेट सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झाली.