मातांच्या सहभागातून फुलला निसर्गसंवर्धनाचा संस्कार

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
नागपूर,
PM Shri Kendriya Vidyalaya पीएम श्री केंद्रीय विद्यालय अजनी येथे ‘एक पेड माँ के नाम ३.०’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात झाला. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी मातांसह रोपांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.प्राचार्य फिरोज खान व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संदीप ठवरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पालकांनी रोपे, कुंड्या व माती आणून सहभाग नोंदविला. वृक्षारोपणाचे प्रात्यक्षिक अरुण कुमार गोस्वामी व गरिमा मिश्रा यांनी सादर केले. यावेळी मातांसाठी विविध खेळ, कुंडी सजावट व निसर्गसंवर्धन संदेश स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
 
 
mithi
 
 
कनक मेश्राम हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या मातोश्री रुपाली मेश्राम यांनी शाळेला १० रोपे, कुंड्या व माती भेट दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
सौजन्य: मिथिलेश झोडे,संपर्क मित्र