चंदीगड,
Raghav Chadha targets the Punjab पंजाबच्या मसुदा मतदार यादीतून भाजपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांचे नाव गायब झाल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या नोंदीत चड्ढा यांची नोंद ‘कायमस्वरूपी स्थलांतरित’ अशी करण्यात आली आहे. मात्र, हा प्रशासकीय प्रकार नसून आपल्याविरोधातील राजकीय सूड असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चड्ढा यांनी सांगितले की, त्यांचे मतदार ओळखपत्र मोहालीमध्ये नोंदणीकृत असून त्यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मोहालीमध्ये मतदान केले होते.
चड्ढा यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगितले की, सध्या ही मसुदा मतदार यादी असून अंतिम यादी ऑक्टोबर २०२६ मध्ये प्रसिद्ध होणार आहे. नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी दावे आणि आक्षेपांची प्रक्रिया सुरू असून ते SIR अंतर्गत कायदेशीर मार्गाचा वापर करत आहेत. त्यांचे नाव ‘स्थलांतरित’ म्हणून कोणी नोंदवले, त्याची पडताळणी कोणी केली आणि पुढील प्रक्रिया कोणी केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रक्रियेत पंजाब सरकारचे अधिकारी सहभागी असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, आम आदमी पार्टीने चड्ढांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत SIRची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत असल्याचे स्पष्ट केले. चड्ढा दिल्लीत राहत असल्याने पंजाबमधील मतदार नोंदणी कायम ठेवणे किंवा हस्तांतरित करणे ही त्यांची जबाबदारी होती, असा दावा ‘आप’ने केला. दुसरीकडे, SIRच्या मार्गदर्शक सूचनांमधील परिच्छेद ४(डी)नुसार विद्यमान खासदारांची नावे ‘संरक्षित यादी’त असायला हवी होती, असा दावा चड्ढा यांनी केला आहे.