शेतकर्‍याच्या गोठ्याला भीषण आग

३ जनावरांसह शेती साहित्य जळून खाक

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
रिसोड,
risod farm fire तालुयातील मौजे चिंचाबांभर शेत शिवारात एका शेतातील गोठ्याला २ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. रामेश्वर अश्रुजी जायभाये रा.कंकरवाडी असेशेतकर्‍याचे नाव आहे. या आगीत गोठ्यातील ३ जनावरे तसेच शेतीसाठी ठेवण्यात आलेले विविध साहित्य जळून ५ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
 

risod farm fire 3 cattle and agricultural equipment destroyed, farmer suffers rs 5 lakh loss 
याबाबत माहिती अशी की रामेश्वर जायभाये हे दैनंदिन प्रमाणे आपल्या शेतातील गोठ्यात आपली जनावरे बांधून त्यांना चारापाणी करत गोठा बंद करून संध्याकाळी आपल्या घरी गेले. यादरम्यान ८ वाजताच्या दरम्यान शेतातील शेजार्‍याने त्यांना फोन करून गोठ्याला आग लागल्याची माहिती दिली. आग विझवण्यासाठी कोणते प्रकारचे साधन नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. जायभाये हे आपल्या परिवाराच्या अन्य सदस्या सोबत गोठ्यावर पोहोचण्यापूर्वीच सर्व जळून खाक झाले होते. गोठ्याला आग लागताच आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने गोठ्यातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या दुर्घटनेत दोन गायी, एक गोर्‍हा तसेच शेती उपयोगी साहित्य स्प्रिंकलर संच, प्रेशर पंप, चार्जिंग पंप, ड्रिप बंडल, हळदीचे खत बैग, ताडपत्री गोठ्याचे साहित्य आणि इतर वस्तूंचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. या आगीत शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.घटनेचा पंचनामा तलाठी प्रज्ञा गरकळ यांनी केला असून, अहवाल शासन दरबारी पाठवला आहे.