अनिल कांबळे
नागपूर,
sexual assault १५ वर्षीय मुलीशी मैत्री करून तिचा गैरफायदा घेत अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून कळमना पोलिसांनी १८ वर्षीय तरुणाला अटक केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील (बीएनएस) कलम ६५(१) तसेच पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छप्पनलाल बांते (१८, रा. पाच नंबर नाका, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आरोपीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये नियमित संपर्क होता. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने २६ जानेवारी ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डेप्युटी सिग्नल परिसरातील मुलीच्या मावशीच्या घरीही अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.sexual assault वेगवेगळ्या दिवशी आणि विविध ठिकाणी हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर कळमना पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास कळमना पोलिस करीत आहेत.