शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहचला पाहिजे: डॉ. दामोदर उकर्डा

जिल्हास्तरीय भटके विमुक्त दिवस साजरा गुणवंत विद्यार्थी कलावंतांचा गौरव

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
बुलढाणा,
dr damodar ukarda विमुक्त जाती व भटया जमाती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजना आणि विकासाचा लाभ पोहोचविण्यास कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन डॉ. दामोदर उकर्डा परकाळे यांनी केले. मेहकर तहसील कार्यालय येथे ३१ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय ‘भटके विमुक्त दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार निलेश मडके, गटविकास अधिकारी दिनकर खरात, नायब तहसीलदार नितीन बोरकर, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख, लिपिक सदाशिव पिसे, पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी नहुषकुमार बोरोडे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक दत्तात्रय वाघ, इ.मा.ब.क. अधिकारी दिपाली पाडवी, निरीक्षक अविनाश नरोटे, कनिष्ठ लिपिक राहुल गुरव यांच्यासह राज्यपाल नियुक्त अशासकीय सदस्य समाधान गुर्‍हाळकर, डॉ. दामोदर परकाळे, भानुदास पवार, शंतनू मुळे आणि तालुकास्तरीय सदस्य उपस्थित होते.
 
 
dr damodar ukarda
 
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजन व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविकात सहाय्यक संचालक दत्तात्रय वाघ यांनी विमुक्त-भटया समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. समाजातील नागरिकांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. तहसीलदार निलेश मडके यांनी मार्गदर्शन करताना विमुक्त व भटया समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे हे प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य असल्याचे सांगितले. भटया समाजातील नागरिकांना आवश्यक असलेल्या १४ प्रकारच्या दस्तऐवजांसाठी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले.
 
 
यावेळी तहसील कार्यालयामार्फत प्रातिनिधिक स्वरूपात जातीचे दाखले, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शिधापत्रिका आणि रहिवासी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. गटविकास अधिकारी दिनकर खरात यांनी समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीवर भर देत शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजाचा खरा विकास शय असल्याचे सांगितले. पंचायत समिती स्तरावरून समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान विविध लोककला सादर करणारे कलावंत, समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच राज्यपाल नियुक्त अशासकीय सदस्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला विमुक्त-भटया समाजातील महिला, पुरुष, विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व सेतू ऑपरेटरही यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण गायकवाड, शिक्षक संदीप गवई, रियान पठाण, चेतन राठोड, भानुदास नागरे, गोविंद राठोड, हनीप चौधरी तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन संदीप राठोड यांनी केले, तर मुख्याध्यापक देवेंद्र पदमने यांनी आभार मानले.