तिबेटमध्ये ५.० तीव्रतेचा भूकंप

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
ल्हासा,
tibet earthquakeतिबेटमध्ये गुरुवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.० इतकी मोजण्यात आली. दुपारी सुमारे १:४६ वाजता भूकंपाचे धक्के नोंदवले गेले. भूकंपाचे केंद्र ३१.४७९ अंश उत्तर अक्षांश आणि ८०.३७० अंश पूर्व रेखांश येथे होते. त्याची खोली जमिनीखाली अंदाजे १४ किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
tibet
 
हा भूकंप तिबेट प्रदेशात नोंदवला गेला. सध्या, कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. प्रशासन आणि संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. २६ ऑगस्टला एक हिमनदी फुटल्यानंतर तिबेटमध्ये भूकंप झाला आणि त्यानंतर पूर आला. चीनला लागून असलेल्या या भागात मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. अशा परिस्थितीत भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़