१५ एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवण्याची वेळ

पावसाअभावी पीक करपल्याने शेतकरी हवालदिल

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
अकोला,
soybean महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत.दरम्यान बाळापूर तालुक्यातील हातरुण येथे पावसाअभावी हताश झालेल्या शेतकऱ्याने १५ एकर सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवले असून आणखी काही दिवस पावसाचा खंड असाच राहिला तर जिल्हाभरात क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.
 
soybean
 
बाळापूर तालुक्यातील हातरुण परिसरात येणाऱ्या अंदुरा भाग २ मध्ये विजय पाटील यांची १५ एकर शेती आहे.खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागत करून शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. मोठ्या मेहनतीनं पीक जगवण्याची धडपड सुरू असतांना पावसाने हुलकावणी दिली. पाऊस न आल्याने जमिनीला भेगा पडल्या आणि सोयाबीन पिकाने माना टाकल्या. उन्हाचा सोयाबीन पिकाला जबर तडाखा बसला. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील पीकाची हानी झाल्याने लावलेला खर्च वसूल होण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्याने बुधवारी दुपारच्या दरम्यान पिकावर रोटावेटर फिरवला. त्यामुळे शेतीला लावलेला खर्च वाया गेला.पिकच येणार नसल्याने आता कर्ज कसे भरावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.