प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक

कारसह १.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
वर्धा,
banned scented tobacco प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध समुद्रपूर पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. समुद्रपूर शहरातील झेंडा चौक येथे करण्यात आलेल्या या कारवाईत कारसह सुमारे १.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 
 
banned scented tobacco
 
२ सष्टेबर रोजी मांडगाव येथील सौरभ डफ (२६) हा कारमधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू समुद्रपूर येथे घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी झेंडा चौकात नाकाबंदी केली. यावेळी एम. एच. ४३ ए. एफ. ३४५७ क्रमांकाची कार अडवून तिची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कारमध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला. पोलिसांनी कारसह संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी पीयूष मानवतकर (३६) यांच्या उपस्थितीत जप्त मुद्देमालाचा पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी सौरभ डफ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास समुद्रपूर पोलिस करीत आहे.