फटाक्यांवर देशभरात सरसकट बंदी नाही!

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ban on firecrackers across the country देशभरात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा कोणताही विचार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. दिवाळी हा सण नागरिकांच्या भावना आणि परंपरांशी जोडलेला असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. मात्र, सण साजरा करताना प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याचाही विचार करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.फटाके फोडण्यासाठी दिवसभर म्हणजेच २४ तासांची परवानगी देता येणार नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सातत्याने फटाके फोडल्यामुळे आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फटाक्यांचा वापर कोणत्या प्रकारे आणि कोणत्या वेळेत करता येईल, याबाबत न्यायालयाकडून विचार केला जाणार आहे.
 
 

डिफ ७  
 
दिवाळीचा उत्सव आणि नागरिकांचे आरोग्य या दोन्ही बाबींमध्ये योग्य समतोल राखण्याची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले. फटाक्यांचे प्रकार तसेच ते फोडण्यासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या वेळेच्या मर्यादेबाबत पुढील सुनावणीत विचार होण्याची शक्यता आहे.दिल्ली-एनसीआर परिसरातील फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणाची सुरुवात २०१५ मध्ये झाली असून, तेव्हापासून न्यायालयाकडून दिल्ली, उत्तर प्रदेशासह उत्तर भारतातील प्रदूषणाचा मोठा फटका बसणाऱ्या भागांमध्ये ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान फटाक्यांच्या वापराबाबत वेळोवेळी विविध निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.