खल्लार फाट्यावर युवकाची निर्घृण हत्या

दोन विधिसंघर्षित बालकांना अटक

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
दर्यापूर
brutal-murder खल्लार फाट्यावर बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ४२ वर्षीय इसमाची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नईमशा तुराबशहा (४२) रा. नागपूर असे मृताचे नाव आहे.
 
murder
अवैध संबंधाच्या संशयातून हा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी खल्लार पोलिसांनी दोन विधिसंघर्षित मुलांना अटक केली आहे. सकाळी १० वाजता खल्लार फाटा परिसरात नईमशा आला असता आरोपींनी कट रचून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात नईमशा याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच खल्लार पोलिस ठाण्याचे ठाणेदार आणि पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे खल्लार आणि दर्यापूर परिसरात भीतीचे वातावरण आहे.