वाशीम,
Cheque Dishonourस्थानिक समृध्दी नागरी व ग्रामीण सह. संस्थेकडुन १ लाख रूपयाचे कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड केली नाही. तसेच कर्ज भरणा करण्यासाठी दिलेला धनादेश अनादरीत झाला, त्यामुळे धनादेश अनादरीत प्रकरणी कर्जदार दत्ता निवृती गायकवाड यास येथील प्रथम न्यायदंडाधिकारी एस. बी. ढेंबरे यांनी एक महिना साध्या कारावासाची शिक्षा व ६० हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
मालेगाव तालुयातील डही येथील दत्ता निवृती गायकवाड याने येथील समृध्दी नागरी व ग्रामीण पथ संस्थेकडुन ११ मार्च २०१७ रोजी पतसंस्थेच्या नियम व अटी नुसार तसेच आवश्यक ते दस्तऐवज करुन १ लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न केल्याने पतसंस्थेने कर्ज रकमेचा हप्ता भरण्याची विनंती कर्जदार दत्ता निवृती गायकवाड यांना केली. मात्र, दत्ता निवृती गायकवाड यांनी कर्ज भरण्यासाठी ३५ हजाराचा धनादेश संस्थेला दिला. हा धनादेश पथ संस्थेने वटवण्याकरिता लावला असता तो अनादरीत झाला.
धनादेश अनादरीत झाल्याने संस्थेने हे प्रकरण वाशीम येथील न्यायालयात कलम १३८ नुसार पत संस्थेचे मुख्य व्यवस्थापक डी. आर. होले यांनी न्यायालयात दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. बी. ढेंबरे यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने फिर्यादी व आरोपी पक्षाची बाजु ऐकुण घेतल्यानंतर गुन्हा सिध्द झाल्याने कर्जदार दत्ता निवृती गायकवाड यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा व ६० हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. या धनादेश अनादर प्रकरणात समृध्दी नागरी व ग्रामीण पत संस्थेतर्फ अॅड. बि. आर. कंगले यांनी बाजु मांडली.