पुलगाव,
Cleanliness Driveपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवडा अंतर्गत पुलगाव भाजपा मंडळाच्या वतीने सीताघाट परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान नदीत मोठ्या प्रमाणात विसर्जन साहित्य व निर्माल्य आढळून आले. निर्माल्य कुंडाची व्यवस्था करण्यात आलेली असतानाही काही नागरिक नदीत साहित्य टाकत असल्याचे निदर्शनास आले.
भाजपा मंडळ अध्यक्ष प्रशांत इंगोले व ओबीसी जिल्हाध्यक्ष मंगेश झाडे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात आले. यावेळी भाजपाचे महामंत्री अरविंद भार्गव, ज्ञानेश्वर कुंभारे, उपाध्यक्ष सुनील अरोरा, विजय ढगे, विजय भांडे, महिला मोर्चा अध्यक्ष रूपाली शुक्ला, महासचिव योगेश मोहळे, गटनेते प्रवीण पनिया, नितीन बिजवे, जांभुळकर, रिचर्ड क्रॉस आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.