बुलढाणा
congress-protest मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात प्रतिकात्मक पुतळ्यास अटक दाखवित काँग्रेसने आंदोलन केले. ज्ञानेश कुमारांचा मुखवटा घातलेल्या एका आंदोलकाला बेड्या ठोकीत काँग्रेसने दि. ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
’वोट चोर, गद्दी छोड’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत तसेच निवडणूक आयोगाच्या काही निर्णयांबाबत सार्वजनिक स्तरावर विविध प्रश्न, आक्षेप व चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेणे आवश्यकत असल्याचे बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, त्यांच्या कार्यकाळाची तपासणी केली जावी, ही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील डॉ. अरविंद कोलते, दत्ता काकस, तुळशीराम नाईक, जयश्रीताई खाकरे यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते.