पुण्याचा प्रथमेश धायगुडे, अमरावतीची शिवांजली केवले प्रथम

श्रीमती नरसम्मा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
अमरावती
elocution-competition श्रीमती नरसम्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात श्रीमती नरसम्मा चषक या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन बुधवार ३० सप्टेंबरला करण्यात आले होते. दोन गटात झालेल्या या स्पर्धेत पुण्याचा प्रथमेश धायगुडे, अमरावतीची शिवांजली केवले प्रथम पुरस्काराची मानकरी ठरले आहे.
 
 
compi
स्पर्धेच्या उद्घाटनाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त श्रीकांत काळीकर, तर उद्घाटक म्हणून उमरखेडचे आनंदीदास महाराज होते. विचमंचावर प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाट, माजी विद्यार्थी अनिरुद्ध महाजन, स्पर्धेचे समन्वयक प्रा. पंकज वानखेडे व प्रा. शीतल खापरे यांची उपस्थिती होती. स्पर्धा वरिष्ठ व कनिष्ठ अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली. वरिष्ठ महाविद्यालयीन गटात प्रथम पारितोषिक प्रथमेश धायगुडे - सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, द्वितीय पारितोषिक आदित्य टोळे - राधादेवी गोयंका महाविद्यालय अकोला व प्रोत्साहनपर पारितोषिक गुंजन सेवतकर - विद्याभारती महाविद्यालय, अमरावती हीला देण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक शिवांजली केवले - बियाणी महाविद्यालय अमरावती, द्वितीय पारितोषिक विदुला पिदडी - नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालय, अमरावती, आणि प्रोत्साहनपर पारितोषिक विद्या पवार - बी. एन. बी. कॉलेज, दिग्रस हिला देण्यात आले. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना महाविद्यालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. दिवसभराच्या स्पर्धेदरम्यान वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयीन गटातील सूत्र संचालन अनुक्रमे प्रा. अरुण मेश्राम व प्रा. सागर बोबडे यांनी केले.
 
नागरी शिष्टाचाराचे पालन - राष्ट्र उन्नतीसाठी आवश्यक, संत शिरोमणी रविदास : सामाजिक समरसतेचे अग्रदूत, वंदेमातरम् : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरक मंत्र या तीन विषयावर सदर स्पर्धा योजित करण्यात आली. उद्घाटन सत्राचे संचालन प्रा. पद्मा कडू तर आभार प्रा. सुवर्णा प्रचंड यांनी मानले. समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर भोंदु तसेच परीक्षक प्रा. शिवाजी आडे, पंकज आत्राम, रणदीप बिसने, प्रा. अनुपमा खवसे, मुख्याध्यापिका विद्या मुऱ्हेकर यांची उपस्थिती होती. संचालन करून आभार प्रा. डॉ. शितल खापरे यांनी मानले. स्पर्धेच्या दोन्ही गटात एकूण ४२ स्पर्धकांनी सहभाग घेतला.