नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी गोंदियाला ३.४३ कोटींची मदत!

घरांसह गोठ्यांच्या नुकसानीची भरपाई मिळणार

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
गोंदिया,
Gondia Newsनैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शहरी व ग्रामीण भागातील घरांसह गोठ्यांच्या नुकसानीपोटी गोंदिया जिल्ह्यासाठी ३ कोटी ४३ लाख ३५ हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. आमदार विनोद अग्रवाल यांनी नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे.
 

gggggggg 
 
ऑगस्ट-सप्टेंबर २०२३ तसेच ऑगस्ट-सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टी व अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे जिल्ह्यातील अनेक घरांचे व गोठ्यांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळावी, यासाठी आ. अग्रवाल यांनी बाधित भागांची पाहणी करून शासनस्तरावर हा प्रश्न लावून धरला होता. नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शहरी व ग्रामीण कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले आहे, त्यांना शासनाच्या नियमानुसार तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली होती.
 
 
दरम्यान, मदत व पुनर्वसन विभागाने २९ सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी करत गोंदिया जिल्ह्यासाठी ३ कोटी ४३ लाख ३५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पात्र लाभाथ्र्यांना नियमानुसार ही मदत वितरित केली जाणार आहे. निधी मंजूर झाल्यानंतर आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील तसेच प्रशासनातील अपर मुख्य सचिवांचे आभार मानले आहे.
 
 
जिल्ह्यातील सर्वच तालुके दुष्काळग्रस्त घोषित करा...
शासनाकडून जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचा समावेश करून संपूर्ण गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा अशी मागणी शासनाकडे केली आहे. दरम्यान, शासनाकडून या मागणीची दखल घेत संबंधित विभागाला प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती आ. अग्रवाल यांनी दिली.