तभाच्या वृत्तांनंतर आयटी पार्क परिसर चकाचक!

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur It park cleanlinessतंत्रज्ञानाचे मुख्य केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या आयटी पार्क परिसरात गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छता, अतिक्रमण आणि बंद पडलेल्या बेवारस वाहनांमुळे घाणीचे साम्राज्य पसरले होते. ​या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी 'तरुण भारत नागपूर'कडून इंस्टाग्रामवर एक विशेष रील चालवण्यात आली होती. या बातमीच्या आणि रीलच्या माध्यमातून आयटी पार्कमधील विदारक परिस्थिती प्रशासनासमोर मांडण्यात आली. 'तरुण भारत'च्या या वृत्तांकनाची आणि सोशल मीडिया रीलची प्रशासनाने तात्काळ गांभीर्याने दखल घेतली आहे.
 

it 
या प्रकारामुळे स्थानिक नागरिक, तसेच येथे कार्यरत असलेले कर्मचारी आणि विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. रस्त्यावर साचलेला कचरा, अस्वच्छता आणि अंधारामुळे महिलांमध्ये सुरक्षेबाबत भीतीचे वातावरण होते.​प्रशासनाने तातडीने कारवाई करत आयटी पार्क परिसरातील साचलेला कचरा हटवला तसेच रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या आणि सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या बंद बेवारस वाहनांची विल्हेवाट लावली.
 
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते राहुल पांडे व नगरसेवक गणेश चार्लेवार यांनी सतत पाठपुरवठा करत आयटी पार्कला स्वछ आणि सुरक्षित बनवण्यात हातभार लावला असून नागपूरला स्मार्ट सिटीत बदलायचे असेल तर नगरसेवकांनाही स्मार्ट राहावे लागेल असे ते म्हणाले. पर्सिस्टंट, इन्फोसिस सारख्या नावाजलेल्या कंपन्यांनी गजबजलेलं आयटी पार्क कचऱ्याच्या विळख्यात न अडकता या परिसराची स्वछता नियमित सुरु राहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . या धडक कारवाईमुळे संपूर्ण आयटी पार्क परिसर आता स्वच्छ आणि सुरक्षित झाला आहे. प्रशासनाच्या या जलद कारवाईमुळे आणि 'तरुण भारत'च्या पुढाकारामुळे नागरिक व विशेषतः महिला कर्मचाऱ्यांमधून समाधान व आनंदाचे वातावरण व्यक्त केले जात आहे.