अल्पवयीन हत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक

जरीपपटक्याचा जिंजर मॉलजवळील घटना : १४ वर्षाच्या मुलाचा खून

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
नागपूर
nagpur murder case जरीपटक्यातील बहुचर्चित १४ वर्षीय आबिद शेख हत्या प्रकरणात गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने ऋतिक उसरबरसे आणि लकी चेवले या दोन फरार आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार अल्पवयीनांसह १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
 

nagpur murder case : two more arrested in 14-year-old boy’s killing
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर रोजी रात्री ९.३५ वाजताच्या सुमारास जरीपटका चौकातील जिंजर मॉलजवळ आबिद उर्फ आबू रज्जाक शेख (वय १४, रा. गौतमनगर) हा मित्र अंतराल सिंग, अमानत इक्बाल शेख व इतरांसोबत उभा होता. जुन्या वादाचा राग मनात धरून सोहेल खान आणि त्याच्या १० ते १२ साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवून आबिदच्या ठिकाणी आले. त्यांनी शिवीगाळ करत दगड-विटांनी मारहाण केली आणि घातक शस्त्राने वार करून आबिदचा खून केला. तसेच त्याचा मित्र अंतराल सिंग याला गंभीर जखमी केले. जखमींना मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी आबिदला मृत घोषित केले. या प्रकरणी मृत मुलाची आई तबस्सुम रज्जाक शेख (वय ३४) यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिस तपासात यापूर्वीच मुख्य आरोपी सोहेल मोहम्मद रियाज रंगरेज (२०, रा. वैशालीनगर), मनीष मनोज वैष्णव (१९), विपुल वैश्य (१९), नीलेश आंबुलकर (१९) आणि ४ अल्पवयीनांसह एकूण ८ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आता गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे फरार आरोपी ऋतिक संजय उसरबरसे (२१, रा. वैशालीनगर) आणि लक्की अशोक चेवले (रा. १९, रा. पाचपावली) यांना अटक करून पुढील कारवाईसाठी पाचपावली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.