इन्स्टाग्रामवरील मैत्रीनंतर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; गुन्हा दाखल होताच आरोपी फरार

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर
nagpur pocso case  इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीनंतर १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला खासगी छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप समोर आला आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी विवेक ऊर्फ विक्की रामकुमार (२०, रा. लोकमान्य नगर) याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

nagpur pocso case  
पोलिसांच्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर २०२५ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत अंबाझरी रॅम्प परिसरात ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. पीडित मुलीची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आरोपी विवेक ऊर्फ विक्कीसोबत ओळख झाली होती. ओळखीनंतर झालेल्या भेटीदरम्यान आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिची खासगी छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सतत संपर्कात राहण्यास तसेच त्याच्यासोबत राहण्यासाठी दबाव टाकल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी सोमवारी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एम), ६४(२)(आय), ३५२ तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४ आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.