स्विगी डिलिव्हरी बॉयच्या वेशात दोघांनी घातला दरोडा

नागरिकांच्या हाती लागलेल्या एकाचा मृत्यू : दुसरा फरार

    दिनांक :30-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर
nagpur robbery case स्विगी फुड कंपनीच्या वेशात आलेल्या दोन दरोडेखोरांनी बेलतरोडीतील एका घरात सशस्त्र दरोडा घातला. सासू-सुनांना चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र आणि पैसे लुटून पळ काढला. आरडाओरडा केल्यानंतर चौकात दोनपैकी एका दरोडेखोराला नागरिकांनी पकडले आणि त्याला चांगला चोप दिला तर दुसरा फरार झाला. बेलतरोडी पोलिस पोहचेपर्यंत नागरिकांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. सुमेध राजेंद्र गजभीये (२८, रा. नरसाळा) असे लोकांच्या मारहाणीत मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे तर दीपक पाटील असे फरार झालेल्या युवकाचे नाव आहे.
 

nagpur robbery case two men disguised as swiggy delivery workers 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा देविदास धार्मिक या मॉडेल मील सोसायटी, बेलतरोडी येथे कुटुंबासह राहतात. मंगळवारी दुपारी पावने दोन वाजता त्या घरात सुनेसह काम करीत होत्या. दरम्यान, दोन युवक स्विगी फूड कंपनीचे कपडे घालून घरात घुसले. त्यांनी उषा यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर दुसऱ्या रुममध्ये झोपलेल्या सुनेला सासूचा रडण्याचा आवाज आल्यामुळे ती बाळाला घेऊन धावत बाहेर आली. आरोपींनी तिलाही चाकूचा धाक दाखवला आणि बाळाला मारण्याची धमकी दिली. तिला घरातील दागिने आणि पैसे आणण्यास सांगितले. काही वेळातच दोन्ही दरोडेखोर घराला कडी लावून पळून गेले. दरम्यान, सुनेने आरडाओरड केली. शेजाऱ्यांनी लगेच धाव घेतली आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी परीसर पिंजून काढला.

जनतेने केली दोघांची धुलाई
परीसरात नागरिकांना nagpur robbery case दरोडेखोरांचा शोध घेतला असता सुमेध गजभीये आणि दीपक पाटील हे दोघे दिसून आले. नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला असता सुमेध त्यांच्या हाती लागला तर दीपक पळून गेला. सुमेधला नागरिकांनी चांगला चोप दिला. नागरिकांच्या बेदम मारहाणीत सुमेधचा मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले. त्यांनी सुमेधचा मृतदेह मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
अजुनही तणाव
सुमेधला मारहाण केल्याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी तीन युवकांना ताब्यात घेतले. त्यामुळे बेलतरोडी पोलिस ठाण्यासमोर तणाव निर्माण झाला. कायदा हातात घेतल्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे अजुनही पोलिस ठाण्यासमोर तणाव निवळला नव्हता. यावेळी पोलिस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर आयुक्त परदेशी, उपायुक्त एन. रश्मीथा राव आणि गुन्हे शाखेचे एसीपी वैभव जाधव घटनास्थळी होते.