मानोरा,
Religious conversionशहरात फसवणूक, चुकीचे प्रतिपादन, प्रलोभन तसेच खोट्या आश्वासनांच्या मार्गाने एका हिंदू युवतीला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा आणि धर्मांतर घडवून आणण्याचा गंभीर प्रकार सुरु असून तसे तीच्या भावाकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्याचे उघडकीस आल्याने याप्रकरणी सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन तक्रारदारांच्या वतीने मानोरा पोलिस स्टेशन २२ सप्टेंबर रोजी देण्यात आले.
तक्रारदाराच्या निवेदनुसार, मानोरा येथील एका युवतीला इस्लाम धर्म स्वीकारण्याच्या प्रक्रियेत आणले जात असल्याची व त्याबाबतचा प्रतिज्ञापत्र (एफिडेव्हिट) तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी संबंधित ठिकाणी पाहणी केली असता, घरा मध्ये एक पुरुष आढळून आला. नागरिकांनी व समाजबांधवांनी तातडीने सतर्कता दाखवत पोलिस प्रशासनाला बोलावून त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर युवतीचे धर्मांतर पूर्णपणे स्वतंत्र, स्वेच्छिक व माहितीपूर्ण इच्छेने झालेले नसून, यात खोटी माहिती, खोटे आश्वासन, प्रलोभन, दबाव किंवा अन्य अनुचित मार्गांचा वापर केला जात असल्याचा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे.
या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी पोलिस स्टेशनमध्ये निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तक्रारदार राजू सुभाष लसनकार व दीपक नारायण लसनकर हे मुलीचे चुलते असून सदर मुलीच्या वडीलाचा मुत्यु झाला असल्या कारनाने पोलिसांत तक्रार चुलत्याने दिली. पोलिस प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे हिंदू वाहीन्यांचे लक्ष लागले आहे.