दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजन

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Aasman Foundation आसमान फाऊंडेशनतर्फे सोनेगाव येथील कर्णबधीर व मूकबधीर निवासी शाळेत रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले. विद्यार्थिनींनी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवि गि-हे व सचिव नरेश शेंडे यांना ओवाळून राखी बांधली.

900 
 
श्री. वासुदेवराव ढोमणे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त फाऊंडेशनतर्फे शाळेतील ५० विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पूजा शेंडे, पंडित तिवारी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
सौजन्य :दिनेश टेकाडे ,संपर्क मित्र