झाडाला रक्षासूत्र बांधून रक्षाबंधन साजरे

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
नागपूर
Adarsh ​​Chaurasia Ladies Club आदर्श चौरसिया लेडीज क्लब नागपूरच्या वतीने यंदा अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. क्लबच्या अध्यक्षा बरखा विनीत चौरसिया यांच्या अध्यक्षते खाली क्लबच्या सदस्यांनी झाडाला राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
  

bhat 
 
  
कार्यक्रमाची सुरुवात सामुदायिक ध्यान व प्रार्थनेने झाली. यावेळी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्षा सरिता विजय चौरसिया तसेच माजी अध्यक्षा शर्मिला गगन चौरसिया यांच्यासह क्लबच्या सदस्यांची उपस्थिती होती. सदस्यांनी झाडाला रेशमी धाग्याचे रक्षासूत्र बांधून औक्षण केले आणि आरती ओवाळली.रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण न राहता निसर्गाशी असलेले आपले नाते जपण्याचा संदेश देणारा ठरावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. झाडे आपल्याला प्राणवायू, सावली आणि पर्यावरणाचा समतोल देतात. त्यामुळे त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.क्लबच्या सदस्यांनी झाडाच्या संगोपनाचा संकल्पही केला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने राबविलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
सौजन्य:शर्मिला चौरसिया,संपर्क मित्र