नागपूर,
Atre Layout Branch राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अत्रे लेआउट शाखेतर्फे रक्षाबंधनानिमित्त परिसरातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षासूत्र बंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. समाजाच्या स्वच्छतेसाठी नियमितपणे कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम होता.
यावेळी सफाई कर्मचाऱ्यांच्या हातावर राखी बांधून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. समाजाच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांशी स्नेहाचे आणि आपुलकीचे नाते दृढ करण्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.कार्यक्रमाला संघचालक गिरीश खेर, दीनदयाळ नगर कार्यवाह प्रशांत व्यास, शाखा कार्यवाह राजीव वैद्य तसेच शाखेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. रक्षाबंधनाच्या माध्यमातून सामाजिक समरसता आणि परस्पर स्नेह वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
सौजन्य:संदीप देव,संपर्क मित्र