वर्धेत मिरवणुकीत लेझर लाईटवर प्रतिबंध

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
वर्धा,
ban on laser lights जिल्ह्यामध्ये दहीहांडी, पोळा, तान्हा पोळा व सार्वजनिक गणेशोत्सवा दरम्यान मोठ्या प्रमाणावर लेझर लाईटचा वापर केला जातो. या लाईटचा प्रकाश डोळ्यांसाठी घातक असल्याने आगामी सण उत्सावात वापरण्यात येत असलेल्या लेझर लाईटवर जिल्हाधिकार्यांनी प्रतिबंध घालण्याचा निर्णय आज ४ रोजी घेतला आहे.
 
 
ban on laser lights
 
मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या डोळ्यांवर लेझर लाईटचा प्रकाश पडल्यास डोळ्यांच्या पडद्यावर तसेच बुबुळावर गंभीर इजा होण्याची शक्यता असते. शांतता व कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वान्मथी सी. यांनी लेझर लाईट वापरावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. दहीहांडी, पोळा, तान्हा पोळा व सार्वजनिक गणेशोत्सव या कालावधीत लेझर लाईट, हाय पॉवर बीम, लेझर शो यांच्या वापरावर प्रतिबंध राहणार आहे. या आदेशाची नागरिकांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे आहे.
डिजेच्या आवाजावरही व्हावा निर्णय
डिजेच्या आवाजाहून राज्यात सध्या वातावरण तापले आहे. वर्धेत लेझर लाईट वापरावर प्रतिबंध घालण्याचे वृत्त सर्वात प्रथम तरुण भारतने जाहीर करतात डिजेवरही बंदी घातल्या जावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.