८० कोटींची ब्राऊन शुगर जप्त; एकाला अटक

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
इम्फाळ,
brown sugar worth 80 crore seized मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात ८० कोटी रुपये किमतीची ब्राऊन शुगर जप्त केल्यानंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली, अशी माहिती आसाम रायफल्सने गुरुवारी दिली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, आसाम रायफल्स, सीआरपीएफ आणि जिरीबाम पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधवारी जेटी रोड परिसरातील माखा बस्ती येथे शोध मोहीम राबवली आणि संबंधित व्यक्तीकडून १०.८९१ किलो ब्राउन शुगर जप्त केली. अटक करण्यात आलेली व्यक्ती आणि जप्त केलेला मादकपदार्थ पुढील कायदेशीर कारवाईसाठी जिल्हा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
 
 
brown sugar worth 80 crore seized