तन्मयाच्या स्वरांची मैफल

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Chitnavis Centre, Nagpur चिटणवीस सेंटरतर्फे वडोदरा येथील युवा गायिका तन्मया क्षीरसागर यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता टॅमरिंड हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे.

fod 
 
 
ग्वाल्हेर घराण्याच्या परंपरेतील तन्मया या पं. बी. एन. क्षीरसागर यांच्या वारशातील पाचव्या पिढीच्या प्रतिनिधी आहेत. त्या राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक असून ‘३० फॉर २०३० नेटवर्क’च्या सल्लागार समितीच्या सदस्य आहेत. मैफिलीदरम्यान श्रोत्यांना शास्त्रीय संगीताची अधिक चांगली ओळख व्हावी, यासाठी ‘संगीत आस्वाद’ सत्रही घेण्यात येणार आहे. त्यांना संवादिनीवर संदीप गुरमुले व तबल्यावर राम खडसे साथसंगत करतील. संगीतप्रेमींनी या मैफिलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य:योगिता चकोले,संपर्क मित्र