नागपूर,
Dahi Handi Festival 2026 श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, महाल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेच्या परिसरात भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
जन्माष्टमीनिमित्त विद्यार्थिनींनी श्रीकृष्णाच्या बालरूपाची वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ‘गोविंदा आला रे!’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दहीहंडी फोडताना विद्यार्थिनींनी एकजूट, सहकार्य, शिस्त आणि संघभावनेचे दर्शन घडविले.पारंपरिक सण-उत्सवांचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावे आणि त्यांच्यामध्ये सामाजिक एकात्मता, सहकार्याची भावना व सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षांच्या प्रतिनिधी सीमा फडणवीस, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माया बमनोटे आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा वासनिक यांची उपस्थिती होती.
सौजन्य :माया बमनोटे,संपर्क मित्र