भारत-पाकिस्तान सामना आज! जाणून घ्या कुठे पाहणार

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
दुबई,
india vs pakistan match today महिला आशिया कप २०२६ मध्ये भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले असून, आता गट फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान असणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हाँगकाँगविरुद्ध १३७ धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील आपली स्थिती मजबूत केली. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आगामी सामना क्रिकेट चाहत्यांसाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.गटातील सुरुवातीच्या सामन्यात थायलंडकडून भारताला ९४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत हाँगकाँगचा १३७ धावांनी पराभव केला. या सामन्यात स्मृती मंधानाने १२४ धावांची ऐतिहासिक खेळी केली. ६४ धावांच्या या खेळीत तिने ७ षटकार आणि १४ चौकार लगावले. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १९३ धावा उभारल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना हाँगकाँगचा संपूर्ण संघ अवघ्या ५६ धावांत बाद झाला.
 
india vs pakistan match
 
भारताच्या गोलंदाजीत दीप्ती शर्माने प्रभावी कामगिरी करत सर्वाधिक ३ बळी घेतले. प्रेमा रावत, नंदनी शर्मा आणि श्री चरानी यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. आता उपांत्य फेरीपूर्वी भारतीय संघाचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ महिला आशिया कप २०२६ मधील ‘अ’ गटात आहेत.भारत-पाकिस्तान महिला सामना शनिवार, ५ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना रात्री ८:०० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे. भारतात या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स टेन १, सोनी स्पोर्ट्स टेन ३ आणि सोनी स्पोर्ट्स टेन ४ या वाहिन्यांवर पाहता येईल. तसेच सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर सामन्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.
 
भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, भारती फूलमली, रेणुका सिंग, शेफाली वर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), कमलिनी (यष्टीरक्षक), नंदिनी शर्मा, प्रतीक रावल, क्रांती गौर, श्री चरणी आणि प्रेमा रावत यांचा समावेश आहे.
 
पाकिस्तान संघ
फातिमा सना, आयेशा जफर, नशरा संधू, गझल फिरोजा (यष्टीरक्षक), मुनीबा अली (यष्टीरक्षक), वहिदा अख्तर, तुबा हसन, सादिया इक्बाल, उम्मे हानी, सदफ शम्स, मोमिना रियासत, अयमान फातिमा, सायरा जबीन, शैलवाल ना जुल्फर आणि इमान ना यांचा समावेश आहे.