अमरावतीत एमपीएससी पेपरफूट विरोधात मोर्चा

विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
अमरावती
mpsc-paper-leak महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराच्या विरोधात आज अमरावतीत विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. पंचवटी चौकातून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढला. शहीद भगतसिंग यांची छायाचित्रे हातात घेऊन विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.

morcha 
 
पेपरफुटीची सखोल चौकशी करा आणि दोषींवर कठोर कारवाई करा, एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले होते. लाखो विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करतात. पेपरफुटीच्या प्रकरणामुळे या विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाला आहे. एमपीएससीमार्फत अत्यंत पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेतल्या जातात, असा विश्वास विद्यार्थ्यांना होता,
 त्यालाच तडा गेला आहे.
 
या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी, असे आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगितले. आमच्या मागण्यांचा शासनाने वेळीच विचार केला नाही, तर आंदोलन राज्यव्यापी आणि तीव्र करू, असा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला.