कृष्णभक्तीत रंगली निमरत कौर!

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
वृंदावन,
nimrat kaur कृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र पर्वानिमित्त अभिनेत्री निमरत कौर वृंदावनमध्ये दाखल झाली. यावेळी तिने बांके बिहारी मंदिरात पूजा-अर्चना करून श्रीकृष्णाचे आशीर्वाद घेतले. ‘द फॅमिली मॅन’ या मालिकेमुळे विशेष लोकप्रिय झालेल्या निमरतने आपल्या या आध्यात्मिक प्रवासातील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले.निमरतने ब्रजधाममध्ये धार्मिक विधींमध्ये सहभागी होत मंदिरात पूजा केल्याचे तिच्या पोस्टमधील फोटो आणि व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.
 
 
nimrat kaur
 
ब्रजभूमीत घालवलेले हे क्षण अत्यंत शांत आणि सुखद अनुभव देणारे असल्याचे तिने पोस्टमधून सांगितले. या आध्यात्मिक प्रवासातील काही आठवणी तिने चाहत्यांसोबत शेअर केल्या. जन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना निमरतने लिहिले की, ब्रजधामच्या जादुई धुळीने स्वतःला धन्य समजत असून, दिव्यता आणि प्रेमाचे साक्षात स्वरूप असलेल्या या भूमीने आपण मंत्रमुग्ध झालो आहोत. या अनुभवातील काही क्षण शब्दांत मांडणे किंवा कॅमेऱ्यात पूर्णपणे टिपणेही कठीण असल्याचे तिने म्हटले. यासोबतच तिने सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.