‘हॉटेल युनिव्हर्स’मधील सेक्स रॅकेटवर छापा

तरुणीची सुटका, हॉटेल मालकाला अटक

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
raid on sex racket at hotel universe ६ गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुरु असलेल्या ‘हॉटेल युनिव्हर्स’ मध्ये छापा घातला. या छाप्यात हॉटेल मालक तरुणींकडून देहव्यापार करवून घेत होता. देहव्यवसाय चालविणाऱ्या हॉटेल मालकाला अटक केली. कारवाईत पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका करीत हॉटेलमधून ५६ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संतोष बचईराम शर्मा (५१, पार्वतीनगर, अजनी) असे अटक करण्यात आलेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे.
 
raid on sex racket at hotel universe
 
माहितीनुसार, हॉटेल मालक संतोष शर्मा हा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी आंबटशौकीन ग्राहकांना देहव्यापाराकरिता जागा उपलब्ध करून देत होता. तसेच पीडित तरुणींना कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यवसाय करून घेत होता. ‘हॉटेल युनिव्हर्स’मध्ये गेल्या काही दिवसांपासून अचानक गर्दी वाढायला लागली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना संशय आला. या हॉटेलमध्ये तरुणींची ये-जा वाढल्यामुळे नागरिक हैराण होते.
 
 
पोलिस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या नेतृत्वातील पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी उमरेड रोड, विहीरगाव येथील हॉटेल युनिव्हर्सच्या रूम नंबर १०४ मध्ये छापा घातला.कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून पीडित तरुणीची सुटका केली असून आरोपीच्या ताब्यातून ३ हजार रुपये रोख, १ मोबाईल, १ डीव्हीआर व इतर साहित्य असा एकूण ५६ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून पुढील कारवाईसाठी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.