संस्कृत दिन उत्साहात साजरा

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Ram Mandir Sanskrit Day संस्कृत भारती, गोकुळपेठ-रामनगरतर्फे रामनगर येथील राममंदिरात संस्कृत दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवी वाघमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका धनश्री देशपांडे, तर प्रमुख वक्त्या म्हणून शैलजा पांडे उपस्थित होत्या.यावेळी मान्यवर वक्त्यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व अधोरेखित करत तिचे जतन व संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली. संस्कृत ही भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा असून, देवभाषा म्हणून ओळखली जाणारी ही भाषा पुन्हा दैनंदिन व्यवहारात आणि संपूर्ण भारतात अधिकाधिक उपयोगात यावी, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
 
ravi
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका जया काळे यांनी केले. मान्यवरांचा परिचय मुग्धा किन्हीकर यांनी करून दिला.. इरा काळे हिने सुस्पष्टपणे संस्कृत श्लोकांचे पठण केले. तसेच आनंदी पांडे हिने संस्कृतमधून वैयक्तिक गीत सादर केले.संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार आणि तिच्याविषयी समाजात अभिमानाची भावना निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
सौजन्य :रवी वाघमारे,संपर्क मित्र