नागपूर,
Rashtra Sevika Samiti शक्तिपीठ फाउंडेशन आणि राष्ट्र सेविका समितीच्या अष्टभुजा शाखेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाचा पवित्र सण सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरा करण्यात आला. पांडे लेआउट येथील दिडोळकर भवनात आयोजित कार्यक्रमात नाट्यकलावंतांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
अष्टभुजा शाखेतील सेविका भगिनींनी उपस्थित नाट्यकलावंतांच्या हातावर राखी बांधून त्यांच्या कलेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक दिशा देणाऱ्या कलावंतांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच पोलीस ठाण्यातील पोलीस बांधव आणि सेवा वस्तीतील नागरिकांनाही रक्षासूत्र बांधून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.यावेळी नाट्यकलावंत, पोलीस बांधव तसेच नागरिकांनी सेविका भगिनींना समाजात सकारात्मक वातावरण आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. रक्षाबंधनाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नागरिकांमध्ये स्नेह, विश्वास आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाली.
सौजन्य:गौरी बेलन संपर्क मित्र