राष्ट्रीय गीतांची समूहगान स्पर्धा

    दिनांक :04-Sep-2026
Total Views |
नागपूर,
 Rashtrasant Tukadoji Maharaj राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांमध्ये प्रसार व्हावा, या उद्देशाने श्रीगुरुदेव युवामंचतर्फे ३ ऑक्टोबरला राष्ट्रीय गीतांची समूहगान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सक्करदरा येथील सेवादल महाविद्यालयाच्या सभागृहात ही स्पर्धा होणार आहे.
 

rashtr 
 
 
स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांच्या चमूंना राष्ट्रसंतांनी रचलेल्या राष्ट्रीय गीतांपैकी एका गीताचे सादरीकरण करावे लागेल. प्रवेशाची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे.शहरातील शाळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीगुरुदेव युवामंचाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक, सत्यशोधक वंदना वनकर आणि सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय शेंडे यांनी केले आहे.
सौजन्य : ज्ञानेश्वर रक्षक,संपर्क मित्र