कारंजा आगारात २६.६७३ हजार एनसीएमसी कार्ड सक्रीय

तात्पुरते अपंग प्रमाणपत्र असलेल्या दिव्यांगांचे थांबलेले मानधन लवकरच मिळणार!

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड आवश्यक
 
कारंजा लाड, 
26673 ncmc cards महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणार्‍या प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड महत्त्वाचे ठरत असून, कारंजा आगारात आतापर्यंत तब्बल २६ हजार ६७३ एनसीएमसी कार्ड सक्रीय झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक हेमंत चांदूरकर यांनी दिली. एसटी महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शासनाच्या विविध सवलत योजनांसाठी पात्र असलेल्या प्रवाशांना एसटी बसमधून प्रवास करताना सवलतीचा लाभ दिला जातो.
 
 
26673 ncmc cards
 
मात्र, या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डची प्रक्रिया महत्त्वाची करण्यात आली आहे.कारंजा आगारामध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी व अ‍ॅटिव्हेशनची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत २६,६७३ कार्डे सक्रीय झाली आहेत. त्यामुळे आगाराच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या संख्येने प्रवाशांनी एनसीएमसी कार्डची सुविधा स्वीकारल्याचे स्पष्ट होत आहे. अद्यापही अनेक पात्र प्रवाशांनी कार्ड काढलेले नसल्याने त्यांनी वेळेत नोंदणी करून घेण्याची गरज आहे. एनसीएमसी कार्डच्या माध्यमातून सवलतीच्या प्रवासाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात या कार्डचा वापर करणार्‍या प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शयता आहे. कारंजा आगारात आतापर्यंत २६ हजार ६७३ कार्डे सक्रीय झाल्याने एनसीएमसी कार्डबाबत प्रवाशांमध्ये चांगला प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे.
 
 
कारंजा आगारातील २६ हजार ६७३ एनसीएमसी कार्डांचे अ‍ॅटिव्हेशन पूर्ण झाले असून, उर्वरित पात्र प्रवाशांसाठीही कार्ड नोंदणी व अ‍ॅटिव्हेशनची प्रक्रिया सुरू आहे. सवलतीच्या प्रवासाचा लाभ सुरळीतपणे मिळण्यासाठी पात्र प्रवाशांनी एनसीएमसी कार्ड काढून घेणे आवश्यक आहे.दरम्यान, एनसीएमसी कार्डच्या माध्यमातून सवलतीच्या प्रवासाची प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध करण्यास मदत होणार असून, प्रवाशांनीही महामंडळाच्या नियमांना सहकार्य करण्याची गरज आहे.
 
एसटी कर्मचार्‍यांशी वाद घालू नये
एनसीएमसी कार्डबाबत काही प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे चित्र आहे. काही प्रवासी कार्ड नसतानाही सवलतीचा लाभ मिळावा, अशी मागणी करतात. मात्र, शासन व एसटी महामंडळाच्या नियमांनुसार सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.त्यामुळे एनसीएमसी कार्ड उपलब्ध नसताना सवलतीचा आग्रह धरून वाहक किंवा इतर एसटी कर्मचार्‍यांशी वाद घालू नये. असे आवाहन परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.