‘महाराष्ट्र एल्फिन्स्टन फाईल’मध्ये अशोक खरातचा हा प्रसंग दाखवला का?

शहाजी बापू पाटलांचा दिपाली सय्यद यांना सवाल

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
सांगोला
maharashtra epstein files अशोक खरातवर चित्रीत होत असलेल्या ‘महाराष्ट्र एल्फिन्स्टन फाईल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये एक घोटाळा झाल्याचा दावा माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. सांगोला तालुक्यात अशोक खरात येऊन पूजा करून गेल्याचा आरोप करताना, या पूजेचा नेमका उद्देश काय होता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सांगोल्यातील जवळा येथे कथितरीत्या पूजा करून आपल्या भाच्याला निवडणुकीत पराभूत करण्यासह जीवे मारण्याची पूजा केल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला.
 

ashok kharat case : sangola controversy, shahaji bapu patil questions maharashtra epstein files movie 
सांगोला येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात बोलताना शहाजी बापू पाटील यांनी हा दावा केला. या मेळाव्याला मंत्री भरत गोगावले, मंत्री योगेश कदम आणि दिपाली सय्यद उपस्थित होत्या. दिपाली सय्यद यांना उद्देशून बोलताना पाटील यांनी सांगोल्यातील अशोक खरात यांच्या कथित कारनाम्यांचा उल्लेख केला आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावरही राजकीय टोला लगावला.
“अशोक खरात सांगोला तालुक्यात येऊन पूजा करून गेला आहे. उघड्या-नागड्या पद्धतीने धिंगाणा घालून सांगोला येथील जवळा येथे पूजा केली आणि माझा भाचा अतुल पवार याला निवडणुकीत पराभूत करून जीवे मारण्याची पूजा केली,” असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला. पुढे ते म्हणाले की, त्यांनी आपल्या भाच्याला याबाबत सांगितले. “तुझा मामा या महाराजाच्या बापाचा बाप आहे. तू मरत नाहीस, काळजी करू नको,” असे आपण भाच्याला सांगितल्याचेही पाटील यांनी नमूद केले.
या कथित घटनेचा संदर्भ देत शहाजी बापू पाटील यांनी दिपाली सय्यद यांना थेट सवाल केला की, “हा प्रसंग अशोक खरातवर चित्रीत होणाऱ्या चित्रपटात घेतला आहे का?” त्यांच्या या वक्तव्यामुळे सांगोल्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा अशोक खरात प्रकरणाची चर्चा रंगली आहे.
 
 
दरम्यान, याच मेळाव्यात maharashtra epstein files शहाजी बापू पाटील यांनी पाणीप्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावरही भाष्य केले. “आमचे पाणी अजितदादांनी इंदापूरला पळवले आणि पाणी राखण्यासाठी रक्तरंजित क्रांती करायची तयारी आम्ही सुरू केली,” असे ते म्हणाले. माध्यमांमध्ये आपली भूमिका जाहीर केल्यानंतर अजित पवार यांचा फोन आल्याचे सांगत पाटील म्हणाले की, त्यावेळी आपण गावात होतो आणि “कागद तुमच्यासमोर आहे, उघडून बघा,” असे त्यांना सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनी पाणी असल्याचे मान्य केल्याचा दावा त्यांनी केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फोन करून असे काही करू नका, असे सांगितल्याचे पाटील यांनी नमूद केले. “आम्हाला कुठली गोष्ट संघर्षाशिवाय मिळाली नाही,” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
या मेळाव्यात राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळेही राजकीय चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्रात लवकरच पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. शहाजी बापू पाटील यांच्या पुनर्वसनाचेही संकेत गोगावले यांनी आपल्या भाषणातून दिले.
शहाजी बापू पाटील धडपडून काम करत आहेत आणि त्यांच्या कामाचे चीज होणे गरजेचे आहे, असे गोगावले यांनी सांगितले. “एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर करतात ते कुणाला कळत नाही. लवकरच राज्यात दुसरे एक ऑपरेशन आहे. आता सांगत नाही, नाहीतर मीडिया बातम्या करेल,” असे म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्याला पूर्णविराम दिला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नेमके कोणते ‘ऑपरेशन’ होणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.