आगामी सण-उत्सव शांततेत साजरे करा

पोलिस विभागाचे आवाहन

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
मंगरूळनाथ,
celebrate the upcoming festivals peacefully आगामी काळात विविध सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होणार असून, या काळात नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सोशल मीडियावरील आक्षेपार्ह किंवा चुकीच्या माहितीवर प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल क्षिरसागर यांनी केले आहे.
 
 
celebrate the upcoming festivals peacefully
 
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस स्टेशन आवारात ४ सप्टेंबर रोजी शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना क्षिरसागर म्हणाले की, सण-उत्सव आनंदाचे व सामाजिक एकोपा वाढविणारे माध्यम आहेत. त्यामुळे सर्व समाजघटकांनी परस्परांच्या भावना व श्रद्धांचा आदर करावा. जातीय व धार्मिक सलोखा निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. मिरवणुका शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने काढाव्यात. मिरवणुकीत डीजेचा वापर टाळून डीजे मुक्त मिरवणूक काढण्याचे आवाहनही त्यांनी केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
 
 
यावेळी पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. बैठकीला गजानन तिडके, सुरज संगत, वीज वितरण कंपनीचे अभियंता संदीप जयपुरकर, पोलिस पाटील, पोलिस अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, विविध समाजातील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. आगामी सण-उत्सवांच्या काळात शहरातील शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.