मंगरूळनाथ,
minor girl sexually assaulted लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून शेलूबाजार येथील ३५ वर्षीय तरुणाविरुद्ध मंगरूळनाथ पोलिस ठाण्यात पोसो कायद्यासह भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश शंकर खंडारे (वय ३५, रा. शेलूबाजार) याने वनोजा शेत शिवारातील एका झोपडीत पीडित अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत दोन वेळा शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पीडित मुलगी १६ वर्षांची असल्याने या प्रकरणात लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोसो) मधील तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मंगरूळनाथ पोलिस ठाण्यात अप. क्र. ६२७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६४(२)(ड) व ६५(१) तसेच पोसो कायदा कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत जुन्या कायद्यातील कलम ३७६ व ३७६(३) यांचाही संदर्भ नमूद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश काळे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी थोरात यांनी केली.