पहलगामचा सूड पूर्णत्वास

शेवटच्या दहशतवाद्यालाही धाडले यमसदनी

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
श्रीनगर,
pahalgam-attack-terrorist-yasir-killed५पहलगाममधील बैसरण खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला कुख्यात दहशतवादी यासीरला बडगाम येथील चकमकीत सुरक्षा दलांनी ठार मारले आहे. हल्ल्यानंतर यासिर बेपत्ता झाला होता. ‘ऑपरेशन अर्शद’मध्ये यासिरला यमसदनी धाडण्यात आले. तो पाकिस्तानचा रहिवासी होता.पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ज्या चार संशयित दहशतवाद्यांची छायाचित्रे प्रकाशित केले होते त्यात यासिरचाही समावेश होता. तो ठार झाल्याने बडगाम जिल्ह्यातील दहशतवादी कारवायांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून तो ठार होणे मोठे यश मानले जात आहे.
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी लोकांचा धर्म विचारून त्यांची हत्या केली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी चार दहशतवाद्यांचे एक संयुक्त छायाचित्र प्रसिद्ध केले होते. यात यासिरसह सुलेमान शाह, जुनैद रमजान आणि हाशिम मुसाचा समावेश होता.
 

shri 
पहलगाम हल्ल्यातील चारही दहशतवाद्यांचा खात्मा
सुरक्षा दलांनी गतवर्षी जुलैमध्ये ’ऑपरेशन महादेव’मध्ये हाशिम मुसाला ठार केले होते. पहलगाम दहशतवादी घटनेनंतर सुरक्षा दलांनी आता सर्व चार दहशतवाद्यांना ठार केले आहे. हाशिम मुसा हा लष्कर-ए-तोयबाचा एक प्रमुख कमांडर होता. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामजवळच्या बैसरन खोऱ्यातील हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता.