पुलगाव,
pulgaons tanha pola येथे अनेक वर्षांपासून शहीद भगतसिंग चौकात श्री. बालहिंद गणेश मंडळ व्यापारी मित्र परिवारातर्फे सर्वधर्मसमभाव आणि जातीय सलोख्याने तान्हा पोळ्याचे आयोजन केले जात आहे. परंतु, काही महिन्यांपूर्वी तेथे तान्हा पोळा भरवण्यावरून गावकर्यांमध्येच आपसी वाद होऊन प्रकरण न्यायालयात गेले. अखेर, खंडपीठाच्या उच्च न्यायालयाने तान्हा पोळा होता त्याच ठिकाणी भरवण्याचे स्पष्ट आदेश दिले.
शहरातील काही लोकांनी पूर्वी भरत असलेल्या तान्हा पोळ्याच्या जागेसाठी नगर परिषदेची दिशाभूल करून ना-हरकत पत्र मिळवले. त्यानंतर पोलिस व अन्य प्रशासकीय विभागांनी चौकशी केली. वारंवार संयुक्त बैठकांचे आयोजन केले आणि जागा बदलून दुसरीकडे तान्हा पोळ्याचे आयोजन करण्याबाबत समजावून सांगितले. परंतु, ते हेतुपुरस्सर दुसर्या ठिकाणी तान्हा पोळा आयोजित करण्यास तयार नव्हते. श्री. बालहिंद गणेश मंडळ अनेक वर्षांपासून पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने तान्हा पोळ्याचे आयोजन करत आहे. तेव्हा नगर परिषदेने दिलेले ना-हरकत पत्र स्थगित केले.
त्यानंतर त्या लोकांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली. परंतु, उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली. जो श्री. बालहिंद गणेश मंडळ व्यापारी मित्र परिवार शहीद भगतसिंग चौक मंडळ आधीपासूनच आपल्या परंपरेचे पालन करत आहे त्याच ठिकाणी, शहीद भगतसिंग चौक येथे तान्हा पोळा आयोजित करण्याची आदेश न्यायालयाने दिले. श्री. बालहिंद गणेश मंडळ शहीद भगतसिंग चौक व्यापारी मित्र परिवाराच्या वतीने अॅड. पेट्रिक अखिलेश यशपाल यांनी बाजू मांडली.