दहीहंडीत भीषण दुर्घटना लोखंडी भाग डोक्यावर पडून महिलेचा मृत्यू

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |
पिंपरी-चिंचवड
pune accident news पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवाची सांगता झाल्यानंतर लोखंडी सांगाडा काढताना घडलेल्या भीषण दुर्घटनेत सलमा सलाउद्दीन पठाण (वय ४५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री सुमारे अकराच्या वाजण्याच्या सुमारास मंडळाचे कार्यकर्ते लोखंडी स्ट्रक्चर खाली उतरवत असताना त्याचा एक अवजड भाग अचानक खाली उभ्या असलेल्या सलमा यांच्या डोक्यावर पडला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या सलमा यांचा जागीच मृत्यू झाला.
 

pune accident news dahi handi structure falls on 45-year-old woman in old sangvi, dies on the spot 
या घटनेमुळे जुन्या सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पठाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, सलमा यांचा मुलगा याच दहीहंडी मंडळात सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतो. मुलाचा मंडळातील सहभाग लक्षात घेता पठाण कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसांकडे कोणतीही तक्रार देण्यास नकार दिला आहे. मात्र, घटना गंभीर आणि अपघाती स्वरूपाची असल्याने पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून घेण्याची विनंती कुटुंबीयांना केली आहे.
दहीहंडीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते रात्री लोखंडी सांगाडा उतरवत होते. याच वेळी स्ट्रक्चरचा एक अवजड भाग अचानक खाली आला आणि सलमा पठाण यांच्या डोक्यावर आदळला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.
 
 
दरम्यान, ५ सप्टेंबर २०२६ रोजी  pune accident news राज्यभरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. यंदा विविध दहीहंडी मंडळांनी गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत. अनेक ठिकाणी मराठी तसेच हिंदी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव यंदा विशेष चर्चेत असून, या महोत्सवात तब्बल ७१ लाख रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत. मोठ्या संख्येने सहभागी होणारी गोविंदा पथके आणि ‘सेलिब्रिटी हंडी’ म्हणून मिळालेली ओळख यामुळे या उत्सवाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडीही मानाची मानली जाते. मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र हंड्या ठेवण्यात आल्या असून, विजेत्या पथकांना प्रत्येकी एक लाख ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. महिलांच्या गोविंदा पथकासाठीही एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
दुसरीकडे, मुंबईतील घाटकोपर येथे मनसेचे गणेश चुक्कल यांच्या दहीहंडी उत्सवात अखिल मालपा डोंगरी-अंधेरी पूर्व या गोविंदा पथकाने यंदा पहिले नऊ थर उभारले. मुंबईत यंदा नऊ थर रचणारे हे पहिले पथक ठरले. मात्र, नऊ थरांची सलामी दिल्यानंतर खाली उतरत असताना नवव्या थरावरील एक गोविंदा कोसळला. या घटनेचा थरारक क्षणही समोर आला आहे.