आजनसरा,
sant bhojaji maharaj devasthan ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूरच्या निःशुल्क बस सेवेने आणि श्री संत भोजाजी महाराज देवस्थान व ज्येष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठान, आजनसरा यांच्या संयुक्त वतीने ४० ज्येष्ठ नागरिकांना घेऊन शेगाव-गुरुकुंज मोझरी दर्शन यात्रा काढण्यात आली. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजू मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संयोजक डॉ. विजय पर्बत यांच्या पुढाकाराने या सेवायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी संत भोजाजी महाराजांचे दर्शन घेऊन देवस्थानचे सचिव शिवदास पर्बत, व्यवस्थापक पिंटू आष्टनकर यांनी नारळ फोडून गण गण गणात बोतेच्या गजरात बस शेगावकडे रवाना केली. या यात्रेत श्री संत भोजाजी ज्येष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक कृष्णा पर्बत, सचिव सुधाकर डेकाटे, गणेश सोनोने, रमेश पुसदेकर, नत्थू हुलके, विठ्ठल नगराळे, जनार्धन जौंजाळ, विनोद जौंजाळ, नरेश राऊत, उरकूडा बावणे, धर्मा काळे, पुरुषोत्तम सिंघन, वासूदेव झाडे, दिवाकर खडसे, पंढरीनाथ उमाटे, आदी सहभागी झाले.
तीर्थयात्रा व्यवस्थापक डॉ. संदीप लोंढे, रोशन धनाडे, बालू पाटील आणि हिंगणघाट येथील कमलाकर ठाकरे, गजानन वाट, गणपत गाडेकर, विनोद नागोसे, देवानंद वाडीगरे, भाऊराव कोटकर, धनराज फुकट, सूर्यकांत आदी ४० यात्रेकरू या भक्ती यात्रेत सहभागी होते.